बेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या - भाजपाची मागणी

मुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने आण करण्याचे काम बेस्टकडून केले जाते. अशा बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक हे पद गेली ५० दिवस रिक्त असल्याने बेस्टच्या दैनंदिन व धोरणात्मक कामाचे निर्णय होत नाहीत. ही गंभीर बाब निदर्शनास आणून देत भाजपाने बेस्ट समितीच्या बैठकीत सभा तहकूबीची सुचना मांडली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर सभा तहकुबीची सूचना फेटाळून लावल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या निषेधार्थ भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.बेस्ट समिती पालिकेची वैधनिक समिती असून ही समिती पालिकेचे अविभाज्य अंग आहे. बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईकरांना सार्वजनिक परिवहन सेवा व वीजपुरवठा या दोन अत्यावश्यक सेवा पुरविल्या जातात. बेस्ट उपक्रमाची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटींची असून या उपक्रमातील कामगारांची संख्या ३७ हजार इतकी आहे. मुंबई शहरामध्ये बेस्ट उपक्रमाचे सुमारे १०.५० लाख वीज ग्राहक आणि ३० लाख बस प्रवासी आहेत. या उपक्रमाच्या सेवा मुंबईकरांना अखंडित व विनाव्यत्यय पुरविण्यात याव्यात यासाठी राज्य शासनाकडून उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असते. गेल्या ३० वर्षापासून राज्य शासनाकडून अधिकार्‍यांची नियुक्ती होते. यानुसार १२ एप्रिल २०२१ रोजी उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक सुरेन्द्रकुमार बागडे यांची दिल्ली येथील केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याने उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सध्या काेराेनामुळे निर्माण झालेल्या महामारीच्या परिस्थितीत उपक्रमाच्या अत्यावश्यक सेवा अखंडित सुरू राहणे गरजेचे असताना पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांना बेस्ट उपक्रमाच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी उपक्रमाच्या मुख्यालयास देखील भेट दिलेली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या गेल्या दोन बेस्ट समिती सभांना देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही. केवळ उपक्रमाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येत असल्याने बेस्ट समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमास पूर्णवेळ कार्यकारी प्रमुख नसणे हे संपूर्ण मुंबईकरांना वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे अशी टीका बेस्ट समिती सदस्य गणाचार्य यांनी केली. पालिकेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रकल्प) यांच्या बेफिकीर वृत्तीचा व बेस्टचे महाव्यवस्थापक पदावर राज्य शासनाकडून प्रशासकीय सेवेतील अधिकारी महाव्यवस्थापक पदावर नियुक्त करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचा निषेध करीत बेस्ट समितीची सभा कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्याची मागणी बेस्ट समिती सदस्य गणाचार्य यांनी केली होती. मात्र सभातहकूबी फेटाळल्याने भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget