बारामुल्लात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

बारामुल्ला - उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील गुंड ब्राथ भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. यात बंदी घातलेल्या लष्कर-ए-​तोयबा संघटनेच्या उच्चपदस्थ कमांडरला सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. शनिवारी सायंकाळी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या अड्ड्याला घेरल्यानंतर ही चकमक घडली.पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले की, मोस्ट वॉन्टेड अतिरेकी मुदस्सीर पंडित हा सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात आणि राजकीय कार्यकर्त्यांवरील अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होता. चकमकीत ठार झालेल्या आणखी एका अतिरेकीचे नाव आसार उर्फ ​​अब्दुल्ला असे असून तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. तो २०१८ पासून भागात सक्रिय होता. लष्कर-ए-​तोयबाचा दहशतवादी मुदस्सीर पंडित हा ३ पोलीस, २ नगरसेवक आणि २ नागरीकांच्या हत्येत सहभागी होता, असे पोलीस निरीक्षक विजय कुमार यांना सांगितले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget