उत्तरप्रदेश, उत्तराखंडमधील विधानसभा बसपा स्वबळावरच लढवणार ; मायावतींची घोषणा

लखनऊ - आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींबाबत, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही. असे मायावतींनी सांगितले आहे.बसपा प्रमुख मायावतींनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे, ”माध्यामातील एक वृत्तवाहिनीकडून  अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.”तसेच, ”या संदर्भात पार्टीकडून पुन्हा असे स्पष्ट केले जाते की, पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार.”यासंदर्भात संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बसपाने, आता राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.पंजाबमध्ये आज शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी, ही एक नवी राजकीय व सामाजिक सुरूवात आहे. जे की नक्कीच इथे राज्यात जनतेचा बहुप्रतीक्षित विकास, प्रगती व आनंदाच्या नव्या युगाची सुरूवात करेल. या ऐतिहासिक पावलासाठी लोकांचे हार्दिक अभिनिंदन व शुभेच्छा, असे मायावती म्हणाल्या आहेत.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget