दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

जम्मू काश्मीर - पुलवाम्यात भाजप नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भाजप नेते राकेश पंडिता यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्यांना ठार केले. राकेश पंडिता यांच्यावर त्याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आला. गोळीबारात राकेश पंडिता गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. राकेश पंडिता हे पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे घटनेची माहिती दिलीय. पोलिसांनी ट्विट केले की, “दहशतवाद्यांनी त्रालमध्ये नगरसेवक राकेश पंडिता यांना गोळ्या घालून ठार केले. श्रीनगरमध्ये २ पीएसओ आणि सुरक्षित हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही राकेश पंडिता पीएसओविना त्रालला गेले होते. त्या परिसराला आता घेराव घातला गेला असून, पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केली. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, आज संध्याकाळी त्राल नगरपालिकेचे नगरसेवक राकेश पंडिता सोमनाथ यांना तीन अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले.घटना घडवून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राकेश पंडिताला उचलून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget