लस घोटाळ्याप्रकरणी शिवम रुग्णालयाच्या पटारिया दाम्पत्यास अटक

मुंबई - शहरातील नऊ बोगस लसीकरण शिबिरे आयोजित करून नागरिकांची आर्थिक फसवणूक  केल्याबद्दल पोलिसांनी शिवम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. शिवराज पटारिया, त्यांच्या पत्नी डॉ. नीता पटारिया यांच्यासह १० जणांना अटक केली. या टोळीने संगनमत करून शिवम रुग्णलयात लसीकरणासाठी वापरून झालेल्या कुप्यांमध्ये सलाईन वॉटर भरून कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लस म्हणून नागरिकांना दिल्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वाास नांगरे पाटील यांनी दिली. 

खासगी लसीकरण शिबिरासाठी शिवम रुग्णालयाला परवानगी देण्यात आली होती. गृहसंकुले, कंपन्या, खासगी संस्थांमध्ये लसीकरण शिबिर राबवता यावे यासाठी या रुग्णालयास कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्या १७ हजारांहून अधिक कुप्यांचा साठा पुरविण्यात आला होता. त्यातून १६८०० व्यक्तींना लस दिल्याच्या नोंदी, प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. मात्र उपलब्ध साठ्याव्यतिरिक्त रुग्णालयाने जादा लसीकरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अतिरिक्त साठा कोठून प्राप्त केला, लस कुठे, कोणाला, कोणाकरवी दिली या प्रशद्ब्रांची उत्तरे डॉ. पटारिया देऊ शकले नाहीत. तसेच शहरात नऊ ठिकाणी बोगस लसीकरण शिबिरे आयोजित करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यातही रुग्णालयाचा सहभाग असावा, असा संशय तपासातून निर्माण झाला. त्यामुळे डॉ. पटारिया, डॉ. नीता यांना अटक करण्यात आल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. बोगस लसीकरण शिबिरे आयोजित करणाऱ्या टोळीचे प्रमुख आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि डॉ. मनीष त्रिपाठी यांची बँक खाती गोठविण्यात आल्याचेही नांगरे पाटील यांनी सांगितले. दंतचिकित्सक असलेल्या डॉ. त्रिपाठी यांचे नर्सिंग सेंटर शिवम रुग्णालयाच्या आवारात आहे. नऊ बोगस शिबिरांसाठी आवश्यक असलेला लस साठा डॉ. त्रिपाठी यांनी पुरवला होता.  नियमांनुसार लसीकरणासाठी वापर झाल्यानंतर कुपी मोडून टाकणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयातर्फे वापरण्यात आलेल्या कुप्या मात्र सुस्थितीत होत्या.

नांगरे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी लसींमध्ये भेसळ केल्याचा थेट पुरावा अद्याप हाती आलेला नाही. मात्र या प्रकरणात आतापर्यंत दोनशे जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यापैकी बहुतांश जणांनी शिबिरांमध्ये आरोपींनी आणलेल्या कुप्या हवाबंद नव्हत्या, अशी माहिती दिली आहे.

महेंद्र प्रताप सिंग, संजय गुप्ता, चंदन सिंग, नितीन मोडे, महोम्मद करिम अकबर अली, गुडीया यादव, डॉ. शिवराज पटारिया, डॉ. नीता पटारिया, श्रीकांत माने, सीमा आहुजा या दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  प्रमुख आरोपी राजेश पांडे आणि डॉ. मनीष त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. त्रिपाठी याच्या नर्सिंग सेंटरमधील दोन विद्यार्थ्यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे.या टोळीविरोधात विविध ठिकाणी नोंद झालेल्या गुन्ह््यांच्या तपासासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे या पथकाचे प्रमुख असतील. गुन्हे नोंद असलेल्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक, तपास अधिकारी या पथकात सहभागी असतील.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget