अहमदनगर महापालिकेत कोण होणार महापौर-उपमहापौर?

अहमदनगर - नगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी नामनिर्देशनपत्र मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करण्यास वेळ दिला आहे. बुधवारी ऑनलाइन पद्धतीने मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती नगर सचिव यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अवघे ३ दिवस राहिले आहेत. या दोन्ही पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत समझोता झाला आहे. महापौर पद शिवसेनेकडे तर राष्ट्रवादीकडे उपमहापौर पद राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मात्र बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय राहणार याकडे लक्ष आहे. तर ऐनवेळी भाजप काय खेळी करणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर या सगळ्या राजकारणामध्ये कोणाच्या गळ्यात महापौर-उपमहापौर पदाची माळ पडणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. दरम्यान निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे. शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशनपत्र घेणे आणि दाखल करण्यासाठी सोमवारी व मंगळवारी (२८ व २९ जून) हे दोन दिवस असणार आहेत. नामनिर्देशन पत्र मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करता येतील. नंतर दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता महापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. या अगोदर दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होईल. याच पद्धतीने उपमहापौर पदाची प्रक्रिया असणार आहे. दरम्यान नामनिर्देशन पत्र हे महापालिकेतील नगर सचिव कार्यालयांमध्ये उपलब्ध होतील, असे नगर सचिव यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget