बनावट यूएलसी प्रमाणपत्र प्रकरण: मिरा-भाईंदर महापालिकेचा नगररचनाकाराला अटक

मिरा-भाईंदर - बनावट यूएलसी प्रमाणपत्र प्रकरणी आरोपी असलेले मिरा-भाईंदर महापालिकेतील नगररचनाकार दिलीप घेवारे यांना गुन्हे शाखेने सुरतमधून ताब्यात घेतले आहे. घेवारे यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्जही केला आहे. बनावट यूएलसी प्रमाणपत्र प्राप्त करून कोट्यवधी रुपायांच्या (१०२ कोटी ८२ लाख) शासकीय महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा चौकशी करत आहे. हे प्रकरण २०१६ मधील असून त्यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली होती.नुकतेच मिरा -भाईंदर महापालिकेतील निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ आरेखक भरत कांबळे आणि वास्तुविशारद चंद्रशेखर उर्फ शेखर लिमये या तिघांना अटक करण्यात आली होती. कारवाईमुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ९ झाली आहे.

बनावट यूएलसी प्रमाणपत्राचे प्रकरण २०१६ मध्ये समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मौजे भाईंदर येथील १७ सर्व्हेपैकी सर्व्हे क्रमांक ६६३, ६६४, ५६९/१, ६६१/१,२,३ आणि ६६२/२ वरील सर्व जमीन ही सन १९९७ च्या मिरा-भाईंदर विकास आराखड्यानुसार रहिवासी क्षेत्रामध्ये (आर झोन) समाविष्ट असली तरी ठाण्यातील यूएलसी कार्यालयातील तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी यूएलसी प्रमाणपत्र देताना सदरचा सर्व्हे हा मुंबई महानगर प्रादेशिक मंडळ १९७३ नुसार हरित क्षेत्रात (जी झोन) आहे. तसेच गावठाणापासून २०० मीटर बाहेर असल्याने नागरी जमीन कमाल धारणा कायद्याच्या तरतुदी लागू होण्यापासून मुक्त आहे, अशा प्रकारचे बनावट यूएलसी प्रमाणपत्र संबंधित विकासकास दिले होते. या आर्थिक व्यवहार झाला होता. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित विकासकाने मिरा-भाईंदर महापालिकेकडून ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडील अकृषिक आदेश प्राप्त करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अकृषिक आदेश प्राप्त केलेले आहेत. त्यानंतर बनावट यूएलसी प्रमाणपत्र आणि जिल्हाधिकारी यांच्याकडील अकृषिक आदेश तसेच इतर कागदपत्रांच्या आधारे मिरा-भाईंदर महापालिकेकडून बांधकाम परवाना मंजूर केला. आणि सदरची जागा विकसित करून शासनाची फसवणूक केली. तसेच कोट्यावधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget