छत्र हरविलेल्या मुलांसाठी पालिकेची आर्थिक मदत

नवी मुंबई - अनाथ मुलांसाठी नवी मुंबई महापालिका अगोदरपासूनच आर्थिक मदत करीत आहे. आता करोनाकाळात ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्या असल्यास पालिकेने नव्याने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रतिलाभार्थी १ ते ६ हजारांपर्यंत आर्थिक मदत प्रतिमहिना करण्यात येणार आहे.करोनाच्या दोन्ही लाटेत अनेक कुटुंबांचा आधार हरपला आहे. राज्यात तर अनेक कुटुंबात एकही सदस्य शिल्लक राहिला नसल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. तर अनेक कुटुंबात एक किंवा दोन्ही पालकांचा करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत शहरात एक व दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्याची संख्या ३३ इतकी आहे.  करोनामुळे अशा अनाथ बालकांची तसेच पतीचे निधन झालेल्या महिलांपुढे पुढील आयुष्य कसे घालवायचे हा मोठा प्रश्न उभा असून त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने चार नवीन योजना तयार आखल्या आहेत. ही मदत मुले अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत करण्यात येणार आहे.करोनामुळे अनेक कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत. ही झालेली हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मात्र दोन्ही किंवा एक पालक गमावलेली मुले तसेच वैधव्य आलेल्या महिलांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून जगण्याची उभारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटेसे योगदान म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  करण्यात येणार असून यासाठी ४ नवीन योजना राबविल्या जात असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६६६.ल्लेू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर ‘कोव्हीड योजना’ या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच पालिका मुख्यालयातील समाज विकास विभागात कार्यालयीन वेळेत माहिती मिळू शकेल.

दोन्ही पालक गमावलेल्या १८ ते २१ वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी ५० हजार प्रतिवर्ष अर्थसहाय्य दिले जात आहे.करोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी १ लाख ५० हजार अर्थसहाय्य. तसेच वैद्यव्य आलेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी दोन टप्प्यात १ लाख रुपये.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget