परमबीर सिंहांवर आरोप करणाऱ्या विकासकावर गुन्हा

नालासोपारा - विरारचे बांधकाम व्यावसायिक मयुरेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस सीसीच्या आधारे इमारत उभी करुन, ती ग्राहकांना विकून फसवणूक केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे. पालिकेचे अधिकारी अक्षय मोखर यांनी राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सूचनेने २०१७ मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप मयुरेश राऊत यांनी केला होता.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणारे विरारचे बिल्डर मयुरेश राऊत यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मयुरेश राऊत हे मेसर्स प्रतिभा एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आहेत. नालासोपारा पूर्वेकडे विजय नगर भागात प्रभाकर भुवन नावाची चार मजली इमारत आहे. तिला सिडकोची बोगस बांधकाम परवानगी वापरुन, ती खरी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे.

बोगस सीसीच्या आधारे इमारत उभी करुन, ती ग्राहकांना विकून फसवणूक करणे, एमआरटीपी अंतर्गत फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी नालासोपाऱ्याच्या तुलिंज पोलीस ठाण्यात मयुरेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेचे अधिकारी अक्षय मोखर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अद्याप राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही.मयुरेश राऊत हे वसई-विरार या परिसरात बिल्डर म्हणून व्यवसाय करतात. परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे.

२०१७ मध्ये पोलिसांनी माझ्या घरात दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचाही दावा राऊतांनी केला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. न्यायासाठी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मयुरेश राऊत यांनी पत्र लिहिले. तक्रारीची दखल घेऊन सध्या परमबीर सिंग यांच्या विरोधात स्टेट सीआयडी चौकशी करत आहे. त्याचप्रमाणे मयुरेश यांनी दुसरी तक्रार परमवीर सिंग आणि इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या विरोधात केली असल्याने त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो चौकशी करत आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget