राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

पुणे - कोरोनाच्या नियमांचा भंग करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.पुण्यातील शिवाजीनगर परिसरात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जमलेल्या गर्दीवर पोलीस काय कारवाई करणार? याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली. यादरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे यांच्यासह १०० ते १५० अनोळखी महिला आणि पुरुष यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे. भादवी कलम १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब, महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२०चे कलम ११ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात मात्र मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना नियमांचे उल्लंघन होऊनही कारवाई का नाही? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget