उद्योग केंद्राला वसईतील नागरिकांचा विरोध

वसई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २०१६ ते २०३६ च्या विकास आराखडय़ात नालासोपारा पश्चिमेतील गोगटे मिठागराच्या पंधराशे एकर जागेत उद्योग केंद्र प्रस्तावित केले आहे. या उद्योग विकास केंद्रांमुळे वसईचा हरितपट्टा उद्ध्वस्त होणार आहे यामुळे या उद्योग केंद्राला वसईतील नागरिकांनी विरोध केला आहे.वसई/विरार शहरात मागील काही वर्षांपासून पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. याचा मोठा फटका वसईतील अनेक गावांना बसत आहे. त्यातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०१६ ते २०३६ पर्यतचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यामध्ये वसई तालुक्यातील नालासोपारा पश्चिमेकडील गोगटे मिठागराच्या पंधराशे एकर मोकळ्या जमिनीवर उद्योग विकास केंद्र दाखविण्यात आले आहे. या मोकळ्या असलेल्या जागेत दरवर्षी पावसाळ्यात वसईतील गास, सोपारा, र्निमळ, वाघोली, नवाळे, सालोली, सांडोर, चुळणे, दिवाणमान, भुईंगाव, गिरीज, आचोळे, बोळींज, उमराळे-करमाळे, समेळपाडा, नालासोपारा शहर, नवघर-माणिकपुर इतक्या गावांतील पाणी या ठिकाणी जाते तर पावसाळ्यात या येथील जागेला अक्षरश:  खाडीचे स्वरूप प्राप्त होत असते. तसेच ही जागा किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) मध्ये येत आहे. तर या जागेत परदेशी पक्षीही वास्तव्यास येत असतात.या जागेला लागूनच अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. यात भातशेती व बागायती शेती केली जात आहे. जर या जागेत उद्योग केंद्र उभारले गेले तर याचा परिणाम हा येथील बागायती पट्टा आजूबाजूचा हरितपट्टा, गावे, आदी नष्ट होण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे. तसेच शहराच्या भौगोलिक रचनेनुसार गास, सोपारा, चुळणे, आचोळेगाव तसेच लगतची गावे ही समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर आहेत. पावसाळ्यात आधीच या भागात पूरस्थिती निर्माण होऊन पाण्याखाली जाऊन येथील जनजीवन विस्कळीत होत असते. अशी स्थिती असतानाही या भागात विकास केंद्र उभे राहिल्यास येथील नागरिकांची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता असल्याचे जागृती सेवा संस्थेचे जॅक गोम्स यांनी सांगितले आहे. यामुळे या जागेत तयार करण्यात येणाऱ्या उद्योग विकास केंद्राला आम्ही विरोध दर्शविला असून तसे पत्र ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. तर या जागेवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामांची परवानगी न देता ही जागा ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून राखून ठेवण्यात यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.आधीच वसईचा हरितपट्टा हा विविध प्रकारच्या कारणामुळे  कमी होऊ लागला आहे. त्यातच आता विकास केंद्र उभारून वसईला आणखीन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वसई तालुक्यातील नालासोपारा पश्चिमेकडील गोगटे मिठागराच्या पंधराशे एकर मधील विकास केंद्राला नागरिकांनी विरोध केला असून जर या जागेत विकास केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget