पाणी खरेदीसाठी ठाणे पालिकेवर १३० कोटींचा बोजा

ठाणे - कोरोनामुळे उत्पन्नावर झालेला परिणाम, बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरामध्ये झालेली वाढ, तसेच देखभाल-दुरुस्ती खर्च यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला खर्च आणि उत्पन्न यामधील ताळमेळ बसवणे अक्षरशः कठीण झाले आहे. प्रशासनाकडून पाणी बिलामध्ये सुचवण्यात आलेली दरवाढ देखील फेटाळण्यात आली असल्याने केवळ पाणी खरेदीसाठी या विभागाला वार्षिक १३० कोटी रुपये मोजावे लागत आहेत. त्या तुलनेत उत्पन्न मात्र ९२ कोटींच्या घरात आहे. परिणामी या आर्थिक वर्षात ७५.४८ कोटींचा अधिकचा खर्च सोसावा लागला असल्याने उत्पन्नापेक्षा पाणीपुरवठा विभागाचा खर्चच दुप्पट असल्याचे उघड झाले आहे.कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या सर्वच विभागांची परिस्थिती गंभीर असून याला पाणीपुरवठा विभागही अपवाद ठरलेला नाही, अशी परिस्थिती असताना या विभागाला मागील दोन ते तीन वर्षांत पाण्याच्या खरेदीसाठीही अधिक खर्चाचा भार सोसावा लागला आहे. बृहन्मुबई महापालिका, स्टेम, एमआयडीसी, तसेच भातसाकडून ठाणे महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून पाणी खरेदी करत असून ठाणे महापालिकेची स्वतःचीही पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, बृहन्मुबई महापालिकेने आपल्या दरामध्ये वाढ केली असल्याने ठाणे महापालिकेला आता पाणी खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. बृहन्मुंबई महापालिका दशलक्ष लिटरसाठी ८ रुपये दर पूर्वी आकारत होती. मात्र, हा दर आता थेट १२.३० रुपये करण्यात आला असल्याने ठाणे महापालिकेने याचा अधिकचा आर्थिक फटका बसला आहे. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये १२३ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, १८९.९६ कोटी रुपये महसुली खर्च झाला. त्यावेळेस ६६ कोटी ६० लाख रुपयांची खर्चात तूट आली. २०१९-२० मध्ये १३१ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न तर, १९५ कोटी ५८ लाख रुपये महसुली खर्च झाला. ६४ कोटी ४० लाख रुपये तूट आली. २०२०-२१ या वर्षात १४९ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न तर, २२५ कोटी २३ लाख रुपये महसुली खर्च झाला आहे. त्यामुळे ७५ कोटी ४८ लाख रुपयांची तूट आली आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी, मुंबई महापालिका, स्टेम, भातसा आदींकडून पाणी खरेदी करीत आहे. या पाणी खरेदीसाठी १०२ कोटींची तरतूद करण्यात आली असतानाही त्यासाठी १२९ कोटी ३५ लाख ११ हजार १७२ रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये एमआयडीसीला वार्षिक ४३ कोटी ९० लाख ६४ हजार ३९७ रुपये, स्टेमला ४४ कोटी ३१ लाख २७ हजार ४९८ रुपये, भातसाला ८ कोटी ८१ लाख २ हजार ७७१ रुपये आणि मुंबई महापालिकेला ३२ कोटी ३२ लाख १६ हजार ५०६ रुपये असा एकूण १२९ कोटी ३५ लाख वार्षिक खर्च झाला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget