दिल्लीत ध्वनी प्रदूषण कायदा आणखी कठोर

नवी दिल्ली - प्रदुषणाच्या विळख्यात असलेल्या दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विना परवानगी लाऊस्पीकर अथवा डीजी सेट्स वापरणाऱ्या व्यक्तींना २५ हजारापर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. तर विनापरवानगी फटाके फोडणाऱ्यांना १ लाखापर्यंत दंड ठोठवण्यात येणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी नियमाचे उल्लंघन केल्यास ठोठावण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. नवीन नियमांप्रमाणे दंड आकारण्यात यावेत, अशी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्ली सरकारला विनंती केली आहे.विनापरवानगी विवाह समारंभात किंवा इतर ठिकाणी पहिल्यांदा फटाके फोडले आयोजक आणि जागेच्या मालकावर २० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास आयोजक आणि जागेच्या मालकावर ४० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास जागेचे मालक व आयोजकाला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.जर सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमात फटाके फोडले तर आयोजकाला १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.सायलेन्स झोनमध्ये फटाके फोडले तर दुप्पट म्हणजे २० हजारांचा दंड ठोठोवण्यात येणार आहे.जर वैयक्तीक किंवा व्यवसायिक जागेत फटाके फोडले तर १ हजार रुपयांचा दंड तर सायलेसन् झोनमध्ये ३ हजारांचा दंड संबंधितांना भरावा लागणार आहे.बांधकामाच्या मशिन्समधून मर्यादेच्या तुलनेत ध्वनी प्रदूषण होत असल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.दिल्ली प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिल्लीतील सर्व प्रशासन, दिल्ली पोलीस व वाहतूक पोलिसांना ध्वनी प्रदुषणाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ध्वनी प्रदुषणाने पक्षी आणि प्राण्यांना जगणे कठीण होते. विविध संशोधनाअंती ध्वनी प्रदुषणाचे प्राणी व पक्ष्यांच्या मानसिक आणि वर्तनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. यामध्ये पक्षी व प्राण्यांच्या प्रजननसह तणावाच्या समस्यांचा समावेश आहे. हे संशोधन युरोपसह उत्तर अमेरिकेत करण्यात आले आहे.अलीकडच्या काळात शहरातील ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे पहायला मिळत आहे. मोठ्या गाड्यांचा कर्णकर्कश आवाज शहरातील प्राणी व पक्षीसाठी घातक ठरला आहे. वाढत्या ध्वनी प्रदुषणामुळे नियमीत दिसणारे पक्षीच आज नामशेष होत असल्याचे चित्र आहे.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget