मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मुंबई - मुंबईसहीत उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी  गुरुवार रात्रीपासूनच पाऊस सुरु आहे. शहरात सतत पडणाऱ्या पवासामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या २५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. क्रांती नगर झोपडपट्टीपासून ते बैल बाजार येथील महानगरपालिकेच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सकाळी काही काळ ठप्प झाली होती. शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये शहरात आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget