अनधिकृत बांधकामावर म्हाडाची कारवाई

 म्हाडाच्या कारवाईने कंत्राटदारांचे धाबे दणाणले... 

मुंबई - १९६२ ते १९७१ दरम्यान, म्हाडाने मुंबई आणि परिसरात म्हाडाच्या जमिनीवर निवासी वसाहतींची निर्मिती केली होती. परंतु, गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १,२,३ या म्हाडा वसाहतींमध्ये मोकळ्या जागांवर आणि निवासी गाळ्याचे म्हाडाच्या परवानगीशिवाय व्यावसायिक गाळ्यांमध्ये रूपांतर करून लाखोंचा नफा मिळवल्याची बाब म्हाडाच्या पाहणीत आढळून आली. या चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून त्याचे व्यावसायिक रित्या वापर केला जात आहे. याविषयी महाडमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत होत्या. त्या अनुषंगाने म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार व सह मुख्य अधिकारी श्री. जीवन गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीलाल नगर येथील अनधिकृत बांधकामावर म्हाडाने हातोडा मारत तोडक कारवाई केली. म्हाडाने निवासी वापरासाठी दिलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करत या ठिकाणी व्यावसायिकरण केले जात आहे. हि बाब म्हाडातील गोरेगाव विभाग मिळकत व्यवस्थापक श्री. लक्ष्मण मुंडे यांच्या निदर्शनास आली होती. २०० ते २५० चौ. फुटांच्या मूळ गाळ्यांमध्ये अनधिकृतरित्या वाढ करत, रुग्णालये, गोडाऊन, वॉशिंग सेंटर, दुकाने, खासगी संस्था अशा स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकांमामुळे म्हाडाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने या अनधिकृत बांधकांमावर हातोडा चालविण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.त्यांनी वेळोवेळी या अनधिकृत बांधकामाला नोटीसही बजावली होती.मात्र, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी नोटिसीला धुडकावत अनधिकृत बांधकाम केल्याने म्हाडाच्या निटिसीला केराची टोपली दाखवली असेच लागेल. त्यामुळेच मुख्य अधिकारी यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना तोडक कारवाईचे आदेश दिले.त्यावर मिळकत व्यवस्थापक श्री. लक्ष्मण मुंडे यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सध्या या भूखंडावर म्हाडा पुनर्विकास करण्याचा विचार करत असून स्थानिकांनाही विश्वासात घेऊनच या ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प राबविणार असल्याचे  म्हाडाकडून बोलले आहे. त्या अनुषंगाने स्थानिकांबरोबर बैठकी घेतल्या जात आहेत. मोतीलाल नगर येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने आता कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे असे चित्र पाहावयास मिळत आहे. Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget