ठाण्यात लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

ठाणे - तीनचाकी मालवाहतूक टेम्पो चालवण्यासाठी दरमहा पैसे न दिल्यास खटला भरून त्रास देईन, अशी भीती दाखवून ५०० रुपयांची लाच घेताना ठाणे शहर वाहतूक शाखेतील एका पोलिस हवालदाराला गुरुवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गणेश चौधरी असे या हवालदाराचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर मालवाहतूक करणारा तीनचाकी टेम्पो असून या टेम्पोमधून गॅस सिलिंडरची वाहतूक केली जाते. परंतु वाहतूक शाखेच्या विठ्ठलवाडी उपविभागातील पोलिस हवालदार गणेश चौधरी यांनी टेम्पो चालवण्यासाठी दरमहा पैशाची मागणी केली होती. तसेच पैसे न दिल्यास खटला भरून त्रास देण्याची भीती दाखवून चौधरी यांनी तक्रारदाराकडे ७०० रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केलेल्या तक्रारीनंतर या विभागाने अगोदर पडताळणी केली. तडजोडीअंती चौधरी यांनी ५०० रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानंतर एसीबीने दुपारी सापळा लावून चौधरी यांना ५०० रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget