आणि बिग बी झाले ट्रोल

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट, व्हिडीओंच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.मात्र यावेळी त्यांना काय नवीन पोस्ट करायचे? असा प्रश्न पडला आहे. अन् या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मदत करावी अशी विनंती त्यांनी आपल्या चाहत्यांना केली. मात्र त्यांची ही विनंती पाहून काही खट्याळ नेटकऱ्यांनी उलट त्यांचीच खिल्ली उडवली आहे.  

बिग बी असे म्हणाले तरी काय?

बिग बी अनेकदा आपले वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता पोस्ट करत असतात. मात्र यावेळी त्यांच्याकडे पोस्ट करण्यासारखे काही नाही. त्यामुळे “लिहिण्यासाठी काहीच नाही” अशा आशयाचे ट्विट बिग बींनी केले. नेहमीप्रमाणेच त्यांचे हे ट्विट देखील काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान काही नेटकऱ्यांनी त्यांना लिहिण्यासाठी नवे विषय सुचवले तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली.अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर येत्या काळात ते ‘चेहरे’, ‘झुंड’, ‘ब्रम्हास्त्र’, ‘मेडे’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. यापाकी झुंड या चित्रपटाची मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण याचे दिग्दर्शन सैराट फेम नागराज मंजुळे करत आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget