माथेरानमध्ये तपासणी करूनच पर्यटकांना प्रवेश

नेरळ - दिवसांत माथेरान शहराला विशेष प्रशासकीय घटक घोषित करून खुले करण्यात आले असून पर्यटकांचा ओघ माथेरानकडे वाढत आहे. प्रशासनाच्या सुचनेनुसार पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेने माथेरान शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे तपासणी केंद्र उघडून तपासणी करूनच पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. काही अटी आणि शर्थी घालून माथेरानचे पर्यटन सुरू आहे. या मध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पर्यटकांची तपासणी करूनच प्रवेश द्यावा ही महत्वाची अट घालण्यात आली होती. त्यानुसार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी थर्मल स्क्रीनिग तपासणी केंद्र सुरू केले आहे. डॉक्टर आणि नर्स हे जातीने हजर राहून पर्यटकांची तपासणी करत आहेत.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget