मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू

मुंबई - मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचे निधन झाले. घरात पूजा करताना कपडे पेटल्यामुळे नलिनाक्षन गंभीररित्या भाजले होते. मात्र भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७९ वर्षांचे होते.के. नलिनाक्षन बुधवारी सकाळी राहत्या घरी पूजा करत होते, त्यावेळी त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते ८० ते ९० टक्के भाजले होते. त्यांना तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चर्चगेटमधील ‘ए’ मार्गावरील शार्लीविले इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. 'बाबा कधीच पूजेची संधी चुकवत नसत. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते पूजा करत होते. यावेळी जळत्या कापरामुळे त्यांच्या लुंगीने पेट घेतला. माझी आई आणि मोलकरीण त्यावेळी घरी होत्या, मात्र बाबांची खोली आतून बंद असल्यामुळे त्यांना काही करता आले नाही.' अशी माहिती त्यांचा मुलगा श्रीजित यांनी दिली.

'देवपूजेच्या खोलीचे दार तोडून आत जाईपर्यंत बराच वेळ गेला होता. त्यांनी पट्टाही लावलेला असल्याने लुंगी सोडवणे शक्य होत नव्हते. त्यांना आम्ही तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली' असेही त्यांच्या मुलाने सांगितले. नलिनाक्षन यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.मूळ केरळातील कोझीकोडचे असलेले के. नलिनाक्षन हे १९६७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारीपदही भूषवले आहे. १९९९ ते २००१ या काळात मुंबई महापालिकेचे आयुक्तपद सांभाळले होते. त्यानंतर त्यांच्याकडे महसूल, वाहतूक यासारख्या अन्य विभागांतील अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget