नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात 'या' सात नवीन महिला मंत्र्यांचा समावेश

 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन सात महिला नेत्यांचा समावेश केला आहे. या समावेशाने मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ११ महिला मंत्री असणार आहेत. दोन वर्षानंतर अपना दलच्या अनुप्रिया पटेल या मंत्रिमंडळात समावेश आहे. तर सहा महिला नेत्यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी सायंकाळी विस्तार करण्यात आला. या विस्तारात १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. नवीन मंत्र्यांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. शोभा कारंडलजे या उडपी चिकमगलुर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विविध मुद्द्यावरून त्यांनी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडल्याचे दिसून आले आहे.दर्शना जरदोश या सुरत लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी २००९ नंतर सलग तीनवेळा सुरतमधून लोकसभामधून विजय मिळविला आहे. हिरे व्यापार वाढण्यासाठी सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करावे, याकरिता त्यांनी मोहिम सुरू केली आहे.वृत्तवाहिन्यांवर वादविवादमुळे (डिबेट) मीनाक्षी लेखी हे देशात घरोघरी नाव माहित झाले आहे. त्या संसदेमध्येही प्रभावशाली वकत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना सार्वजनिक उपक्रमावरील संसदीय समितीच्या चेअरमनपदाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाची जबाबदारीही सांभाळली आहे.अनुप्रया देवी यादव या झारखडंमधील कोडेरमा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.प्रतिमा भौमिका, या पश्चिम त्रिपूराचे प्रतिनिधीत्व करतात.महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डॉ. भारती पवार या मूळच्या व्यवसायाने डॉक्टर आहेत.दोन वर्षानंतर अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय आदिवासी कल्याण राज्य मंत्री रेणुका सिंह आणि केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरांजन ज्योती यांचा समावेश आहे.

दरम्यान, देवश्री चौधरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून विस्तार करताना वगळण्यात आले आहे. त्यांच्याकडे केंद्रीय महिला आणि बालविकास राज्य मंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वगळता सर्व महिला मंत्र्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे.पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात १२ महिला मंत्री होत्या. तर सध्याच्या मंत्रिमंडळात ११ महिला मंत्री आहेत.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget