४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश

श्रीनगर  - दोन ठिकाणी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकी गुरुवारी कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात झाल्या.कुलगाम जिल्ह्यातील झोदार भागात दहशवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात दोन लष्कर-ए-तैयबा संघटनेचे दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसरी चकमक ही पुलवामा जिल्ह्यातील पुचल येथे झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget