दिल्लीत २५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

नवी दिल्ली - हेरॉईनची तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पर्दाफाश केला आहे. स्पेशल सेलने टोळीमधील चार आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात २५०० कोटी किंमत असल्याचे सांगितले जात आहे.स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा म्हणाले, की गुप्त माहितीनुसार चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस तस्करीचे पाळेमुळे शोधत आहोत. तस्करीतील नेटवर्कशी संबंधित लोकांची चौकशी करण्यात येत आहे. आरोपी दिल्लीमध्ये केव्हापासून तस्करी करत आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अटकेतील आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींचे तस्करीचे जाळे कुठवर आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. जेएनपीटी बंदरात सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत टॅल्कम पावडरचा साठा असलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल २९० किलो हेरॉईन ३ जुलै २०२१ रोजी आढळली होती. प्राथमिक माहितीनुसार, हेरॉईनची मोठी खेप सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती. या माहितीच्याआधारे कस्टम विभागाने जेएनपीटी बंदराच्या परिसरात कारवाई केली

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget