व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

ठाणे - व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकारी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून तब्बल ४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलची आणि एक मोटारबाईक जप्त करण्यात आली आहे.ठाण्यातील एका गुन्ह्यात आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या, व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला. यावेळी दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांना आढळून आले. दोघा मोटारसायकलस्वार व्यक्तींना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ किलो १०० ग्रॅम इतकी समुद्रात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी आढळून आली. मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे असून पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल ४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.समुद्रात तरंगणारे सोने म्हणून ज्या वस्तूची ओळख आहे, ती म्हणजे व्हेल माशाची उलटी, औषध बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे उलटीला आंतरराष्टीय बाजारात करोडोंची किंमत आहे. हेच ओळखून आणि करोनाकाळात आलेल्या आर्थिक संकटाशी दोन हाथ करण्यासाठी आरोपींची हे कृत्य केले आहे, यांच्यावर या आधी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, अशी ही माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. तर या दोघांना ठाणे न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मोठे कमिशन मिळवण्यासाठी त्यांनी हे काम केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या व्हेल माशाच्या उलटीचा वापर उच्चप्रतीचे परफ्यूम बनवण्यासाठी आणि औषधामध्ये होतो. ही उलटी फार दुर्मिळ असते त्यामुळे तिची किंमत ही मोठी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मोठी किंमत असते. या उलटीचा वापर अन्य कामासाठी होतो. त्यामुळे हे अंबरग्रीस म्हणजे समुद्रातील तरंगणारे सोने असल्याचे पोलीस सांगत आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget