कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन ; वारीला पायी निघालेल्या बंडातात्या यांना अटक

पुणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, भाजपने पायी वारी व्हायला हवी, अशी भूमिका घेतली. त्याला काही वारकऱ्यांनी पाठिंबा दिला. त्या भूमिकेवर ठाम राहत शनिवारी पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.राज्यातील कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिएंटचे काही रुग्णही राज्यात आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी सरकारने नियमावली जारी केली. त्यानुसार, पायी वारीला मनाई करताना मानाच्या पालख्या एसटी बसने पंढरपूरला नेण्याची परवानगी दिली आहे. सरकारचा हा निर्णय धुडकावून लावत कराडकर यांनी पायी वारी करण्याची भूमिका घेतली होती. वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले होते. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते.‘वाघ म्हटले तरी, खातो आणि वाघ्या म्हटले तरीही खातोच,’ असे म्हणत त्यांनी पायी वारीला जाण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार, कराडकर यांनी शनिवारी आपल्या समर्थकांसह पायी वारी सुरू केली. पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या वारकऱ्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget