हॅकरने कंपनीचा ईमेल हॅक करून दोन कोटींचा घातला गंडा

नवी मुंबई - हॅकरने युके येथील ऑफ्टासेन्स या परदेशातील कंपनीचा ईमेल आयडी हॅक करून त्याद्वारे तुर्भे एमआयडीसीतील कंपनीला तब्बल दोन कोटी ३३ लाख हजार रुपये (दोन लाख २५ हजार पाऊंड ) त्याच्या बँक खात्यात पाठविण्यास भाग पाडून दोन्ही कंपन्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणातील ऑफ्टोसेन्स ही कंपनी युकेत आहे, तर एराट्रॉनिक्स ही कंपनी तुर्भे एमआयडीसीत आहे. एरॉट्रानिक्स कंपनीला लागणारा माल युके देशातील ऑफ्टोसेन्स या कंपनीकडून मागविण्यात येतात. त्यानुसार, २९ एप्रिल रोजी एराट्रॉनिक्स या कंपनीने ऑफ्टासेन्स कंपनीला ईमेल पाठवून मालाची ऑर्डर दिली होती. या मालाची किंमत चार लाख ५० हजार ब्रिटिश पौंड इतकी असल्याने ऑफ्टासेन्स कंपनीने माल पाठविण्यापूर्वी ५० टक्के रक्कम पाठविण्याबाबत एराट्रॉनिक्स कंपनीला ईमेलद्वारे कळविले होते. तसेच, त्यांना बँक खात्याची माहिती दिली होती. याच कालावधीत हॅकरने ऑफ्टासेन्स कंपनीचे ईमेल आयडी हॅक करून त्याद्वारे एराट्रॉनिक्स कंपनीला दुसरा ईमेल पाठवून त्यात दुसऱ्या बँक खात्याची माहिती दिली. तसेच, या बँक खात्यावर मालाची रक्कम पाठविण्यास सांगितले.

त्यामुळे एरॉट्रानिक्स कंपनीने ऑफ्टोसेन्स कंपनीला ईमेल पाठवून बदलेल्या बँक खात्याबाबत खात्रीदेखील केली, मात्र हॅकरने त्याच बँकेत पैसे पाठविण्याबाबत पुन्हा ईमेलद्वारे कळविल्याने एराट्रॉनिक्स कंपनीने अज्ञात हॅकरने दिलेल्या बँकखात्यात दोन कोटी ३३ लाख रुपये (२ लाख २५ हजार पौंड) पाठवून दिले. त्यानंतर पैसे पाठविल्याबाबतची पावती ऑफ्टोसेन्स कंपनीच्या ईमेलवर पाठवून दिली. मात्र पैसे मिळाले नसल्याचे व चुकीच्या बँकखात्यात पैसे पाठविण्यात आल्याचे ऑफ्टोसेन्स कंपनीने एरॉट्रॉनिक्स कंपनीला कळविल्यानंतर एरॉट्रॉनिक्स कंपनीने व ऑफ्टासेन्स कंपनीने चौकशी केली. त्यानंतर हॅकरने ऑफ्टोसेन्स कंपनीचा ईमेल आयडी हॅक करून त्याद्वारे एरॉट्रॉनिक्स कंपनीला ईमेलद्वारे दुसऱ्या बँक खात्याची माहिती पाठवून त्यांना त्या खात्यात तब्बल (दोन लाख २५ हजार पौंड)दोन कोटी ३३ लाख रुपये पाठविण्यास भाग पाडल्याचे आढळून आले. त्यानंतर एरॉट्रानिक्स कंपनीने तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget