सीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा सुरुवात करणार, अखिल गोगोई यांची घोषणा

गुवाहाटी - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठप्प झालेले आंदोलन पुनर्जिवित करण्यात येईल, असे आसामचे अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनी म्हटले आहे. विकासासाठी आपले आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी म्हटले.मी तुरुंगात असताना आंदोलनाशी निगडीत अनेक नेत्यांनी राज्यातील नागरिकांचा विश्वासघात केला. पण मी लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की सीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. कोणत्याही (अवैध) परदेशी नागरिकाला राज्यात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अखिल गोगोई म्हणाले. तुरुंगातून सुटकेनंतर पहिल्यांदाच आमदार म्हणून अखिल गोगोई आपल्या मतदारसंघात दाखल झाले होते.२२ जून रोजी विशेष एनआयए न्यायायलयाने शिवसागरमध्ये आमदार अखिल गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना डिसेंबर २०१९ मध्ये आसाममध्ये सीएए कायद्याविरोद्ध हिंसक आंदोलनात कथित भूमिकेसाठी यूएपीए अंतर्गत सर्व आरोपांतून मुक्त केले होते. गोगोई आणि त्यांच्या सहकारी बेकायदेशीरकृत्य (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत दोन प्रकरणांत आरोपी होते. डिसेंबर २०१९ मध्ये एका हिंसात्मक आंदोलनातील कथित भूमिकेच्या आरोपाखाली त्यांना १९ महिने तुरुंगात राहावे लागले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसागर मतदारसंघातून विजय मिळवला. 'रायजोर दला'चे संस्थापक अखिल गोगोई यांना ५७,२१९ मते मिळाली. तुरुंगातून निवडणूक जिंकणारे ते पहिले व्यक्ती ठरलेत.भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. २०२६ साली नवी सरकार बनवले जाईल. आजपासून भाजप हटाओ आंदोलनाला सुरूवात झाली, असेही ते म्हणाले.गुवाहाटीपासून जवळपास ४०० किलोमीटर दूर शिवसागरच्या रस्त्यावर गोगोई यांना अनेक ठिकाणी थांबावे लागले. त्यांचे समर्थक आणि स्थानिक लोक त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी उभे राहिलेले दिसले. निवडणूक जिंकल्यानंतर गोगोई यांचा हा पहिलाच शिवसागर दौरा ठरला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget