मेट्रोचा एलआरटी प्रकल्प रद्द ; ठाण्यात धावणार रेग्युलर मेट्रो

ठाणे - शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाणेकरांसाठी आता आनंदाची बातमी म्हणजे मेट्रो लाइनवर केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार होणारा लाईट अर्बन रेल ट्रान्झिट (एलआरटी) प्रकल्प हा रद्द होऊन आता रेग्युलर मेट्रो धावणार आहे. ठाणे शहरासाठी इंटरनल मेट्रो म्हणून मेट्रो रेल लाइनचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आला होता. तत्कालीन केंद्र शासनाने लाईट रेल मेट्रो करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने मागच्या वर्षी लाईट रेल मेट्रोचा डीपीआर तयार करून राज्य शासनाच्या मंजुरीमार्फत केंद्र सरकारकडे एक निर्णय घेऊन त्यावर कारवाई केली होती. मात्र, रेग्युलर मेट्रो आणि लाईट रेल मेट्रोच्या कॉस्टिंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही. म्हणून रेग्युलर मेट्रोचा विचार करा, असा शासनाकडून पत्र आम्हाला मागील महिन्यात प्राप्त झाले. त्यासाठी आम्ही तयारी देखील दाखवली आहे. यावर एकदा शासनाचा निर्णय झाला तर रेग्युलर मेट्रोच्या संदर्भात एक डीपीआर तयार करून राज्य शासनाच्यामार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे आणि दोन्ही शासनाच्या मंजुरीनंतर पुढील कामाचे दिशा ठरवले जाईल, असे ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget