नोकरीचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक

नवी मुंबई - नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर वडिलांसाठी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला सायबर चोरट्यांनी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून २४ हजार ६९८ रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांच्या टोळीवर फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.सोनलकुमार सिंग हा कामोठे सेक्टर-२१मध्ये राहण्यास असून सध्या तो शिक्षण घेत आहे. सोनलकुमारचे वडील लष्करातून निवृत्त झाले असल्याने तसेच त्यांना नोकरीची गरज असल्याने सोनलकुमारने सिक्युरिटी सुपरवायझर या पदाच्या नोकरीची शोधा-शोध सुरू केली होती. त्यासाठी सोनलकुमार याने जून महिन्यामध्ये नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर वडिलांची माहिती टाकली होती. काही दिवसांतच किर्ती एके नावाच्या महिलेने सोनलकुमार याला संपर्क साधून जॉब फॉर नोकरी डॉट कॉम या नावाची तिची एजन्सी असल्याचे सांगितले. त्यांच्या वेबसाइटवर माहिती भरून क्यूआर कोड स्कॅन करून दोन हजार ६९९ रुपये पाठविण्यास सांगितले. टप्प्याटप्प्याने आणखी रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर ही वेबसाइट बोगस असल्याचे सोनलकुमारला समजले. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने कामोठे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget