व्हिडीओ पोस्ट करत कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

पुणे - सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हंटले आहे. त्यांनी पुण्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजू म्हणतात, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझे कुठच्याही प्रकारचे पेमेंट तिथे थकीत नाही. सगळे पेमेंट रेग्युलरली दिलेले आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.हे कालही मी क्लीअर केले आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी यांनी सांगितले की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेले नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझे कुठचेही काम सुरु होऊ देत नाही. सध्या माझ्याकडे ५ प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातले एक प्रोजेक्ट झीचे मला सोडून द्यावे लागले. कारण मला ते कामच करू देत नाहीत. तसेच दशमी क्रिएशनचे काम सुरु असताना त्यांनी ते थांबवले आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget