महागाई विरोधात राष्ट्रवादीचे मुंबईत आंदोलन

मुंबई - मुंबईमध्ये पहिल्यांदाच गेल्या महिनाभरात पेट्रोल शंभरी पार झाले आहे. गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. महागाई सतत वाढत आहे. ही भाववाढ कमी न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारला देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलची सतत दरवाढ होत आहे. एकीकडे करोनामुळे सामान्य लोकांचे हाल होत आहेत त्यात महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असताना पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सतत होत आहे. नुकतेच केंद्र सरकारने गॅसच्या दरात वाढ केली आहे. महागाई आणि वाढत्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या आदेशानुसार मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. मुंबईमध्ये पहिल्यांदाच पेट्रोल शंभरीपार गेले आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहेत. महागाई कमी करावी, पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत म्हणून मालाड,कांदिवलीमध्ये आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आम्ही मोजके लोक येथे जमलो आहोत. केंद्र सरकारने याची वेळीच दखल घ्यावी आणि महागाई कमी करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget