राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? शिल्पाला पोलिसांनी विचारले १० प्रश्न

मुंबई - सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची राहत्या घरी पोलीस चौकशी करण्यात आली. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला होता. अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का? याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. यावेळी शिल्पा शेट्टीला जवळपास १० महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.राज कुंद्राला घेऊन क्राईम ब्रांचची टीमशुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी गेली होती. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

शिल्पाला १० महत्त्वाचे प्रश्न विचारले

१) तुमच्याकडे चांगले शेअर्स होते, तेव्हा २०२० मध्ये तुम्ही विआन कंपनी का सोडली?

२) विआन आणि कॅमरिन कंपनी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

३) लंडनमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी विआनच्या ऑफिसचा वापर बर्‍याच वेळा केला गेला आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

४) हॉटशॉट कोण चालवते हे आपणास माहित आहे का?

५) हॉटशॉटच्या व्हिडीओ सामग्रीबद्दल आपल्याला काय माहिती आहे?

६) तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात सहभाग घेतला आहे का?

७) हॉटशॉटबद्दल प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणा) यांच्याशी कधी संवाद झाला आहे का?

८) अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलवरील काही चॅट्स आणि मेसेजबद्दल प्रश्न

९) आपल्याकडे राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? (तो काय काम करतो, त्याचा व्यवसाय क़ाय आहे )

१०) राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहाराबद्दल काय माहिती आहे?

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना त्याच्या घरात सर्व्हर आणि ९० व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राजला याबाबत विचारले असता, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेले नाही, असा दावा त्याने केला.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget