मुंबई महानगरपालिकेने शिवम रुग्णालयाला ठोकले टाळे

मुंबई - मुंबईतील उच्चभू परिसरात बोगस लसीकरण झाल्याची माहिती उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी कारवाई करत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांसोबत मुंबई महानगरपालिकेनेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एका रुग्णालयावर कारवाई केली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात असलेल्या चारकोप भागातील शिवम रुग्णालयावर मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी कारवाई केली आहे. पालिकेने शिवम नर्सिंग होमचा परवाना रद्द करून संपूर्ण परिसर सील केला आहे. मुंबई नर्सिंग होम्स नोंदणी कायदा १९४९ अंतर्गत महानगरपालिकेने रुग्णालयाचा नोंदणी परवाना सुद्धा रद्द केला आहे.माहितीनुसार, मुंबई मनपाच्या आर-दक्षिण वॉर्डचे अतिरिक्त आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले की, आम्ही या रुग्णालयाचा परवाना रद्द केला आहे त्यामुळे यापुढे हे रुग्णालय सुरू ठेवता यणार नाही. आम्ही रुग्णालयाची इमारत सुद्धा सील केली आहे जेणेकरुन पुन्हा या ठिकाणी काही गैरकृत्य होऊ नये. बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रुग्णालयाय हे मुख्य केंद्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही रुग्णालयावर कारवाई केली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget