मुंबईत पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु

मुंबई - कोरोना संकटाचा सामना करताना महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या ५ रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईत कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासली होती. यावेळी काही रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. तेव्हापासून मिशन ऑक्सिजन सुरु आहे. कोव्हिड-19 बाधित रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ ठिकाणी वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू उत्पादन करणाऱ्या संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे.मुंबई महापालिकेची ऑक्सिजन निर्मिती प्रक्रियेत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. यात वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, वांद्र्यातील भाभा रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, कूपर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालय या पालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे प्रक्रिया सुरु आहे. मुंबईत ऑक्सिजनअभावी १६८ पालिका रुग्णालयातील दीडशे रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता. इतकेच नाही तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. मात्र तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करुण्यात आली आहे.यात वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल इत्यादी उपस्थित होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget