मुंबईत बांधकाम सुरु असणारी इमारत पडली

मुंबई - मुंबईत बांधकाम सुरु असणारी ४ मजली इमारत समोरच्या घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेली ५ लोक अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी रेस्क्यू केली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका १+३ असे ४ मजल्याच्या घराचे बांधकाम सुरु असताना  ते बांधकाम समोरच्या ३ घरांवर कोसळले. या घरांच्या ढिगाऱ्याखाली ५ लोक अडकलेली होती ज्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये बाहेर काढले. या ५ जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र या सर्व घरांचा ढिगारा मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवान काढण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वन प्लस थ्री असे मिळून चार मजल्यांच्या अनधिकृत घरे असल्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये भीती पसरली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget