करण जोहर होस्ट करणार ‘बिग बॉस ओटीटी’

मुंबई - टीव्हीचा सर्वात मोठा रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षक या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी बिग बॉस खूप खास असणार आहे. या कार्यक्रमाचा प्रीमियर टीव्हीवर होणार नाही, तर ओटीटी वर होईल. वास्तविक, शोचे पहिले ६ आठवडे प्रथम ओटीटीवर दाखवले जातील. सलमान खान दर वेळीप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्टिंग करेल, पण ओटीटीवर जो शो प्रदर्शित होणार आहे, त्याचे होस्टिंग करण जोहर करणार आहे. करण जोहरच्या आधी सिद्धार्थ शुक्ला याचेही नाव यासाठी पुढे आले होते. असे म्हटले जात होते की, सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस ओटीटी होस्ट करेल. पण स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, करणचे नाव यासाठी निश्चित करण्यात आले आहे.अद्याप मेकर्स किंवा करण कडून कोणतेही अधिकृत निवेदन आले नसले तरी करण या कार्यक्रमाचे होस्टिंग कसे करतो आणि प्रेक्षकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.व्हूटने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, बिग बॉस ओटीटीचा प्रीमिअर होईल आणि चाहते २४ तासांमधून कधीही हा शो पाहू शकतात. अलीकडेच सलमानने शोचा पहिला प्रोमोही शेअर केला होता, ज्यामध्ये तो स्वत: खूप हसतो आणि प्रेक्षकांना सांगतो की, हा सीझन खूप खतरनाक होणार आहे. या वेळी शोमध्ये सामान्य लोकही येणार आहेत, ज्यांची सेलेब्सशी तगडी स्पर्धा होणार आहे. निर्मात्यांनी आश्वासन दिले आहे की, हा हंगाम मनोरंजन आणि इमोशन्सनी परिपूर्ण असेल, म्हणून त्यांनी बिग बॉस ओटीटीची मजा सर्वात आधी व्हूटवर दिसणार आहे.‘बिग बॉस ओटीटी’बद्दल बोलताना सलमान खान म्हणाला की, ‘हे चांगले आहे की, यावेळी बिग बॉस डिजिटली दाखवले जाईल. टीव्ही आधी ६ आठवडे व्हूटवर दिसतील. याद्वारे प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच होणार नाही, तर ते स्वतः सहभागी होऊन टास्कही देऊ शकतात. यावेळी प्रेक्षक देखील ‘बिग बॉस’ची भूमिका बजावू शकणार आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget