दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई - दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षाचे होते. सकाळी ७.३० च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिलीप कुमार यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र, आज त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिलीपकुमार यांच्या निधनानंतर राजकारण, चित्रपट सृष्टी, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणाने निधन झाले. दिलीप कुमार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. श्वास घेताना दम लागण्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्याचे खंडन सायरा बानो यांनी केले होते. दिलीप कुमार यांचे खरे नाव मुहम्मद यूसुफ खान आहे. त्यांनी १९४४ मध्ये आलेला चित्रपट 'ज्वार भट्टा'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले. ते एक एक प्रख्यात अभिनेते होते. अभिनयात ते इतके निपुण होते की सत्यजित रे यांनी त्यांना ‘द अल्टिमेटिथ मेथड अ‍ॅक्टर’ ही उपाधी दिली होती. त्यांची तुलना हॉलिवूड कलाकारांशी केली जात असे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सिनेप्रेमींच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget