राज्यपालांनी १२ रोखले तर भास्कर जाधवांनी १२ ‘बाद’ केले

मुंबई - अधिवेशनाचा पहिला दिवस नि:संशय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या नावावर राहिला. कारण त्यांनी जे केले किंवा काही कारणाने जे काही सभागृहात घडले, त्यामुळे भाजपचे १२ आमदार वर्षभरासाठी तरी बाद झाले. विशेष म्हणजे तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांच्यासारखा जहाल नेता खुर्चीत आहे याचे भान न ठेवता भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला आणि त्याचाच फायदा आघाडी सरकारने घेतला. यात भूमिका वठवली ती भास्कर जाधवांनी.शिवसेना नेते भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला. मोदी सरकारने म्हणजेच केंद्राने ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला डाटा केंद्राने द्यावा अशी मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी भूजबळ उठले. त्याला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचे म्हणणे होते की, या ठरावाची नोटीस नाही, हे असे करणे नियमात बसत नाही, फडणवीस विविध कामकाज नियमांचा हवाला देत आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी फडणवीस कसे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीस जे काही मुद्दे मांडतायत त्याकडे दुर्लक्ष करुन जाधव भूजबळांना ठराव मांडायला सांगत होते. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक होत होता. शेवटी त्याच गोंधळात भास्कर जाधवांनी तो ठराव मांडून घेतला. आम्हाला आमेच मुद्दे मांडू द्या म्हणून फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी त्याच स्थिती मताला टाकलेला प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले. आता मात्र भाजप आमदार जास्तच आक्रमक झाले. गोंधळाची ठिणगी पडली ती इथेच. भाजपाचे आमदार संजय कुटे,गिरीश महाजन हे अध्यक्षाच्या थेट व्यासपीठावर गेले. संजय कुटे तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी भास्कर जाधवांच्या समोरचा माईक खेचला. त्यावर जाधवांनी त्यांना इशारा केला. नंतर कुटेंनी तो माईक सोडला पण तोपर्यंत जो गोंधळ, वाद, गदारोळ व्हायचा तो होऊन गेला. सभागृहातल्या गोंधळानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांच्या कॅबिनमध्येही मोठा गोंधळ झाला. तिथे प्रत्यक्ष काय घडले याचे फुटेज कुणाकडेच नाही. पण दारात भाजपच्या आमदारांनी केलेली गर्दी स्पष्टपणे दृश्यांमध्ये दिसते. पंधरा मिनिटे संपल्यानंतर पुन्हा भास्कर जाधव सभागृहात आले आणि झिरवळांच्या कॅबिनमध्ये त्यांना आई बहिणीवर भाजपच्या आमदारांनी शिविगाळ केल्याचा आरोप केला. हा आरोप खूप गंभीर होता. पण जाधवांनी तो सभागृहात इतका डिटेल सांगितला की विरोधी पक्ष गोत्यात आला. भास्कर जाधवांनी काय घडले हे सांगितल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो मंजूरही झाला. दुसरीकडे भास्कर जाधव यांनीच शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपच्या निलंबित आमदारांनी केला. माझ्यावर झालेला शिवीगाळीचा आरोप सिद्ध केलात तर तुमच्याएवढाच काळ निलंबीत व्हायला तयार असल्याचे जाधवांनी जाहीर केले. म्हणजेच भाजपने केलेल्या प्रत्येक गोष्टीवर भास्कर जाधवांनी कुरघोडी केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget