सिरिशा बांडला ठरणार अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला

गुंटूर (आंध्र प्रदेश) - भारतीय वंशाची सिरिशा बांडला एक नवा इतिहास रचण्यास तयार झाली आहे. मुळची आंध्र प्रदेशमधील असलेली सिरिशा अंतराळ प्रवास करणार आहे. अशी कामगिरी करणारी ती सुनिता विल्यम्सनंतर दुसरी भारतीय वंशाची महिला आहे. अमेरिकेची खासगी अंतराळ संस्था व्हर्जिन गैलेक्टिकचे सर रिचर्ड ब्रेनसन यांच्यासोबत सहा जण अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सिरिशा बांडलाचा देखील समावेश आहे.व्हर्जिन गैलेक्टिने त्यांचे अवकाशयान 'यूनिटी-22' (Unity-22) ११ जुलै रोजी लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. अंतराळात उड्डाण करण्याची कामगिरी करणारी सिरिशा ही तेलुगू वंशाची पहिली महिला ठरेल. अंतराळ प्रवासादरम्यान, सिरीशा रिचर्स संबंधित काम करणार आहे. अभियान अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयोग म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच अंतराळ प्रवासासाठी आवश्यक सर्व परवानगी कंपनीला मिळाली आहे, अशी माहिती व्हर्जिन गॅलॅक्टिककडून देण्यात आली आहे. सिरीशाचे कुटुंब वॉशिंग्टनमध्ये स्थायिक झाले आहे. सिरीशाने वॉशिंग्टनमधील एरोस्पेस आणि अ‍ॅस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी मिळवली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर, सिरिशा २०१५ पासून व्हर्जिन गॅलॅक्टिकमध्ये कार्यरत आहेत. सिरिशाचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला होता. नातीच्या या कामगिरीमुळे सिरिशाचे आजोबा खूप आनंदित आहेत. ते म्हणाले की, सिरिशा अंतराळात जाणार्‍या तेलगू वंशाची पहिली महिला म्हणून विक्रम रचणार आहे. त्यांनी सांगितले की, सिरिशाचे वडील मुरलीधर यांनी प्लांट पॅथॉलॉजीमध्ये पीएचडी केली आणि १९८९ मध्ये ते अमेरिकेत गेले. तिथे ते अमेरिकन सरकारसाठी काम करत आहेत. सिरीशाची आई अनुराधासुद्धा तिथे काम करते आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये राहते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget