सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा 'अखिल भारतीय राजभाषा सम्मेलनाचे आयोजन'

ठाणे - भारताची सर्प्रथम पूर्ण स्वदेशी बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ने मंगळवार, दिनांक ३०.०६.२०२१ रोजी डिजिटल माध्‍यमाने अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन आयोजित केले. या सम्मेलनचे अध्यक्ष पद कार्पोरेट कार्यालयात पदस्‍थ  बँकेचे व्‍यवस्‍थापकीय निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एम. वी. रावजीने भूषविले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि उपाध्यक्ष, केंद्रीय हिन्दी संस्थान श्री अनिल जोशी होते. विशिष्ट अतिथि म्‍हणून  श्री बी.एल.मीना जी, निदेशक, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार, आणि विशेष अतिथि म्‍हणून श्री भीम सिंह जी, उप निदेशक, राजभाषा, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार होते.  या सर्व सन्‍माननीय पाहुण्‍यांनी दिल्ली स्थित आपआपल्‍या कार्यालयात उपस्थित राहून उत्कृष्ट राजभाषा हिन्‍दी भाषेचे कार्यान्वयन संबंधी आपआपले बहूमुल्य विचार व्यक्त केले. तसेच या डिजिटल कार्यक्रमाची भरपूर प्रशंसा केली. देशाच्‍या कानाकोप-यातून डिजिटल माध्‍यमाने या सम्मेलनात कार्पोरेट कार्यालय मधून बँकेचे कार्यपालक निदेशक श्री विवेक वाही व श्री राजीव पुरी आणि महाव्‍यवस्‍थापक(राजभाषा), श्री स्मृति रंजन दाश तसेच सर्व महाव्‍यवस्‍थापक यांनी याशिवाय सर्व फील्ड महाव्‍यवस्‍थापक, सर्व वरिष्ठ प्रादेशिक व्‍यवस्‍थापक आणि सर्व प्रादेशिक व्‍यवस्‍थापकांनी उपस्थिति दर्शवली.या वेळी बँकेचे व्‍यवस्‍थापकीय निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एम. वी. राव यांनी एक आकर्षक राजभाषा पोस्टर, एक पॉकेट हिन्दी कार्ड, बँकेची गृह पत्रिका “सेन्ट्रल मंथन” चा नवीन अंक तसेच मुंबई अंचलची ई-पत्रिका “यशस्करम” प्रकाशि‍त केले. 

 डावीकडुन – श्री एस आर खटीक, एफजीएम, श्री स्मृति रंजन दाश, महाव्‍यवस्‍थापक(राजभाषा), श्री राजीव पुरी, कार्यपालक निदेशक श्री एम वी राव, व्‍यवस्‍थापकीय निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,  श्री विवेक वाही, कार्यपालक निदेशक

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget