मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मोठे खाते, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही घेतली शपथ

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला महत्वाची खाती आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आले.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. रात्री खातेवाटप जाहीर केल्यानंतर राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे खाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होते. गडकरींकडील हे अतिरिक्त खाते काढून नारायण राणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कपिल पाटलांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर खातेवाटपात पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. भारती पवार यांचे नाव अचानक समोर आले त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली. त्यानंतर खातेवाटपात भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची पदभार सोपवण्यात आला आहे. पेशाने डॉक्टर असलेले भागवत कराड यांचीही केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. बुधवारी संध्याकाळी भागवत कराड यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर खातेवाटपात भागवत कराड यांच्याकडे महत्वाचा पदभार सोपवण्यात आला. कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.रावसाहेब दानवे यांचं मंत्रिपद जाणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. पण मंत्रिमंडळ विस्तारात रावसाहेब दानवे यांची जबाबदारी वाढवण्यात आली आहे. दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री, कोळसा राज्यमंत्री आणि खाणकाम राज्यमंत्री अशा ३ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget