मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ४२ टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत ३६ जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील ४२ टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेने याबाबत अहवाल जाहीर केला. यात मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री कोट्याधीश असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात यावरुन चर्चेला उधाण आले आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेच्या अहवाला नव्या मोदी मंत्रिमंडळात ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याचे  स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातही २४ मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर ४ मंत्र्यांवर अगदी खुनाचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय ५ मंत्र्यांवर समाजातील सौहार्द आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे गुन्हे दाखल आहेत. ७ जणांवर निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा ठपका आहे.मोदी मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री हे कोट्याधीश आहेत. या मंत्र्यांची सरासरी संपत्ती तब्बल १६.२४ कोटी इतकी आहे. ४ जणांनी तर आपली संपत्ती ५० कोटींपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget