तीरथसिंह रावतांचा राजीनामा; आता कोण होणार मुख्यमंत्री?

डेहराडून - उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडींनी वातावरण तापले आहे. तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पाच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री बदलण्याची ही तीसरी वेळ आहे. राज्याला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळणार आहेत. या संदर्भात भाजपा दुपारी तीन वाजता विधिमंडळ पक्षाची महत्वाची बैठक घेणार आहे. उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयीची घोषणा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, मोदी लाटेत भाजपाने भरीव विजय मिळविला आणि ५७ जागा घेऊन सत्ता स्थापन केली होती. परंतु डबल इंजिन सरकारमध्येही राज्याच्या नेतृत्त्वावरून पेचप्रसंगाचे वातावरण होते. पूर्ण बहुमत असूनही, त्रिवेंद्र रावत यांना कार्यकाळ होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची खुर्ची गमवावी लागली. त्याचबरोबर तीरथसिंग रावत यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता पुन्हा एकदा राज्यात नेतृत्वबदल होणार आहे.

तीरथसिंह रावत यांनी १० मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लोकसभेचे खासदारही आहेत. अशा परिस्थितीत तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर६ महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घेण्याचा नियम होता. म्हणजेच त्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत राज्यातील रिक्त जागांवर नजर टाकली तर गंगोत्री, हल्द्वानी विधानसभा जागा सध्या रिक्त आहेत. परंतु कोरोना परिस्थितीत या जागांवर पोटनिवडणूक घेणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नेतृत्व बदलणे हा भाजपा हाय कमांडकडे एकच पर्याय उरला होता. सर्व समीकरणे लक्षात घेता उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलण्याचा निर्णय उच्च कमांडने घेतला आहे.

मागील तीन दिवसांपासून तीरथ सिंह रावत दिल्लीमध्ये होते. शुक्रवारी त्यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री तीरथ सिंह रावत दिल्लीहून डेहराहूनला परतले. त्यानंतर ते थेट सचिवालयात गेले. सचिवालयातील कामकाज आटपवून पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली नाही. त्यानंतर राजभवनात पोहोचले आणि रात्री अकरा वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.तीरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्याने राज्याचा पुढचा प्रमुख कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवाराच्या नावाचा निर्णय भाजपा विधिमंडळ मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक, मंत्री धन सिंह रावत, सतपाल महाराज, बिशन सिंह चुफाल यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. तसेच तीरथ यांच्या आधी मुख्यमंत्री असलेले त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याकडे सत्ता सोपविण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget