१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार सुरू

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होईल आणि ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. ही माहिती अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश लोकसभा आणि राज्यसभेकडून जारी केले आहेत. लोकसभेने जारी केलेल्या आदेशानुसार १७ व्या लोकसभेचे सहावे अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. राज्यसभेच्या अधिकृत आदेशानुसार, राष्ट्रपतींनी १९ जुलै रोजी राज्यसभेची बैठक बोलावली आहे. कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाईल आणि अंतरांची काळजी घेतली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ताज्या आकडेवारीनुसार लोकसभेच्या ४४४ आणि राज्यसभेच्या २१८ सदस्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निवडक खासदारांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत.अलीकडेच पंतप्रधान मोदींनी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी तयार राहण्याचे निर्देश मंत्र्यांना दिले होते. महामारी हाताळण्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या खोट्या दाव्यांचे खंडन करण्यास त्यांनी मंत्र्यांना सांगितले. कोरोना लसीकरण मोहिमेबाबत अधिक जागरूकता वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी जोर दिला. तसेच पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.अधिवेशनात सरकार अनेक बिले सादर करु शकते. या दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, लसीकरण आदी मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी समितीने गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget