हृतिक रोशन आणि दीपिका 'फाइटर' चित्रपटासाठी सज्ज

मुंबई - बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच 'फाइटर' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून चित्रपटाच्या स्टार कास्टनेही यासाठी तयारी दर्शविली आहे. हृतिक रोशनने यासंदर्भात फोटो शेअर केले आहेत. हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त 'फाइटर' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. २०२२ मध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हृतिक रोशन अखेरचा वॉर या चित्रपटात दिसला होता. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनही दिसणार असल्याची बातमी आहे. त्याचबरोबर लवकरच दीपिका पादुकोण आगामी '८३' आणि 'पठाण' या चित्रपटातही दिसणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget