'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट

मुंबई - अभिनेता आमिर खानचा भाऊ हैदर अली आणि पत्नी इव्हा ग्रोव्हर सोबत घटस्फोट झाला होता. इव्हा ही छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून तिने काम केले आहे. तर काही चित्रपटांतही ती दिसली होती. हैदर अली हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ताहीर हुसेन यांचा लहान मुलगा आहे. तर अभिनेता आमिर खानचा लहान सावत्र भाऊ आहे. हैदरने ‘दिल तो दीवाना है’ फिल्म मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हैदर आणि इव्हाने प्रेमविवाह केला होता.इव्हा आणि हैदर यांच्या विवाहानंतर त्यांना एक मुलगी देखील आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांच्यात कलह सुरू झाला. व या कलहाच रूपांतर घरगुती हिंसेत झाले. इव्हाने त्यांचे लग्नं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता पण ते शक्य झाले नाही. इव्हाने हैदर वर घरगुती हिंसेचे आरोप लावल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. टीव्ही अभिनेत्रीने केलेल्या या आरोपांमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. इव्हाने इंडिया फोरम ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल होत की २००८ साली त्यांनी घटस्फोट घेतला. हा खूप कठीण प्रसंग होता पण रोजच्या हिंसेपासून सुटकारा हवा होता. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.इव्हाने फेमस शो 'ऑफिस-ऑफिस' आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ यामध्येही काम केले आहे. इनटॉलरेंसच्या मुद्यावर जेव्हा आमिर खानने विवादस्पद वक्तव्य केले होते तेव्हा हैदर त्याच्या मदतीला आला होता. तेव्हाही हैदरवर टीका झाली होती. नुकताच अभिनेता आमिर खान पत्नी किरन राव यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे हैदर देखील चर्चेत आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget