एमपीएससीच्या परीक्षा लवकर घ्या,रोहित पवारांची ठाकरे सरकारला विनंती

पुणे - राज्य लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. राज्यात मोठ्या संख्येने तरुण या परीक्षेची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी देखील हा धक्का ठरला. या तरुणाच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त होतानाच दुसरीकडे एमपीएससीच्या कारभारावर आणि निर्णय प्रक्रियेतील ढिलाईवरही तीव्र टीका होऊ लागली आहे. खुद्द सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी देखील या मुद्दयावरून सरकारला विनंती केली आहे. “युवा पिढी निराश असून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात”, अशी विनंती रोहीत पवार यांनी ट्वीट करून केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये रोहीत पवार यांनी परीक्षा घेण्यासोबतच तातडीने त्यांना नियुक्त्या देखील देण्याची विनंती केली आहे. “करोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, असे  ट्वीट रोहीत पवार यांनी केले आहे.


 Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget