अर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गाचे आमदार रवी राणा यांनी केले लोकार्पण

अमरावती - शहरातील राजापेठ येथील भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यात शनिवारी (३ जुलै) आमदार रवी राणा यांनी आपल्या मर्जीने अर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मास्कही लावला नव्हता. यावेळी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, यानंतर रवी राणा यांनी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. अमरावतीच्या प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्यानंतर २००८ मध्ये अमरावती रेल्वे स्थानकाचे रूपांतर मॉडेल रेल्वे स्थानकात झाले. त्यानंतर या रेल्वे स्थानकावरून अमरावती-मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती-पुणे या गाड्या धावायला लागल्या. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रेल्वे रुळावरून उड्डाणपुलाची निर्मिती झाली. याचवेळी रेल्वे रुळाच्या खालून भुयारी मार्गही प्रस्तावीत करण्यात आला. दस्तुरनगर, राजापेठ अशा मोठ्या लोकसंख्येच्या परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण लोकसभा निवडणुकीपूर्वी झाले होते. तेव्हापासून भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, तीन वर्षे उलटूनही हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आमदार राणा यांनी राजापेठ ते दस्तूर नगरकडे जाणाऱ्या मार्गाचे लोकार्पण केले. राजापेठ ते दस्तूर नगर मार्गाकडे वळणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, शंकर नगरकडे वळणाऱ्या भुयार मार्गाचे काम आद्यप सुरू झालेले नाही. भुयारी मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यास आणखी वर्ष लागणार आहे. त्यात आमदार रवी राणा यांनी केलेले लोकार्पण अनधिकृत असंल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे आज जरी हा मार्ग सुरू झाला असला तरी शंकर नगरच्या दिशेचे काम सुरू होताच या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागणार असल्याचेही महापालिका प्रशासन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.आमदार रवी राणा यांनी भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. यावेळो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने भुयारी मार्ग पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले. आमदार राणा शेकडो कार्यकर्त्यांसह संपूर्ण भुयारी मार्गात ढोल ताशे वाजवत फिरले. यावेळी भाऊराव डोंगरे या वृद्ध व्यक्तीच्या हातून भुयारी मार्गाची फित कापण्यात आली. तासभर चाललेल्या या कार्यक्रमात आमदार रवी राणा मास्क न लावताच वावरताना दिसले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget