लस न घेताच नागरिकाला मिळाले प्रमाणपत्र, नवी मुंबईतील प्रकार

नवी मुंबई - करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत अनेक गोंधळ समोर येत आहेत. लसीकरणासाठी वेळ बुक केल्यानंतर लस घेतलेली नसतानाही लस घेतल्याचा संदेश कळंबोलीमधील एका व्यक्तीला आला आहे. त्यामुळे आता लसीकरण कसे करून घ्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कळंबोली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पनवेलमध्ये लसीकरणाची वेळ मिळत नसल्याने ऑनलाइन पद्धतीने लसीकरणासाठी वेळ बुक केली. यावेळी त्यांना भिवंडी येथील लसीकरण केंद्र मिळाले. त्यामध्ये त्यांनी दुपारी ३ ते ५ ही वेळही निवडली. मात्र ऑफिसच्या कामामुळे त्यांना लस घेण्यासाठी जाता आले नाही. असे असतानाही, संध्याकाळी ४ वाजता त्यांना मोबाइलवर मेसेज आला. 'तुम्हाला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तुमचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या,' असे या संदेशात म्हटले होते. लसीकरणासाठी गेले नसतानाच लसीकरण झाल्याचा मेसेज आलाच कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांच्या नावावर लस घेतल्याची नोंद झाली असल्याने त्यांना प्रत्यक्षात लस घेताच येणार नाही, अशी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget