अभिनेता आमिर खानचा किरण रावसोबत १५ वर्षांनी काडीमोड

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. गेल्या १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू, असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आमिर खान आणि किरण राव यांनी जाहीर केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, १५ वर्षाच्या सुंदर सोबतीमध्ये आयुष्यभर स्मरणात राहणारे अनुभव जगता आले. आनंद, हास्य आणि आमचे नाते हे विश्वास, आदर आणि प्रेम याच्या आधारावर फुलले. आता आम्ही आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करत आहोत. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असे न राहता सह पालक आणि कुटुंब म्हणून एकत्र राहू. आम्ही गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहण्यासाठी नियोजन सुरू केले होते. आता हा निर्णय झाल्यामुळे बरे वाटत आहे. एक्सटेंडेड कुटुंबाप्रमाणे आम्ही वेगळे राहिलो तरी आयुष्यातील महत्वाच्या घटना शेअर करत राहू. आम्ही मुलगा आझादसाठी पालक म्हणून दोघेही एकत्रितपणाने जबाबदारी पार पाडू, त्याचा सांभाळ दोघेही संयुक्तपणाने करु, असे देखील म्हटले आहे. आम्ही एकत्रितपणे चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये काम करत राहू. आमचे कुटुंबिय आणि मित्र यांना देखील धन्यवाद देतो कारण आमच्या नात्यामध्ये काही घडत असताना त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो. आम्ही आमचे शुभचिंतक आम्हाला या निर्णयाबद्दल शुभेच्छा देतील अशी आशा आहे. हा घटस्फोट म्हणजे काही शेवट नाही. नवीन प्रवासाची सुरुवात आहे, असे संयुक्त पत्र आमिर खान आणि किरण राव यांनी लिहिले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget