सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबई -  सरकार आपल्याच कर्माने कोसळेल, आणि हे सरकार जेव्हा कोसळेल त्या वेळेस आम्ही पर्यायी सरकार देऊ असा दावा विधानपक्ष विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून अजूनही सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडल्यास पर्यायी सरकार देऊ असेही फडणवीस म्हणाले. सरकार स्थापनेसाठी भाजप कडून अजून पर्याय उपलब्ध आहेत का? यावर देखील आता तर्क वितर्क लावले जात आहेत.राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे १०६ आमदार निवडून आले आहे. तर अपक्ष आमदारांचा पाठींबा भाजपला आहे. मात्र तरीही भारतीय जनता पक्ष बहुमताचा १४५ आकडा पार करू शकत नाही. त्यामुळे या आकड्याची जमवाजमव भारतीय जनता पक्ष कसे करणार? हा सवाल उपस्थित होतो. त्यातच पावसाळी अधिवेशनात गैरवर्तणुकीमुळे भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीत सरकार स्थापन करावयाचे झाल्यास या १२ आमदारांना त्यात भाग घेता येणार नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये काही ना काही वाद सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक चढाओढीमुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचेच चित्र आहे. मात्र, तिन्ही पक्षातील नेत्यांकडून आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचे वक्तव्य सातत्याने केले जात आहेत. तसेच आघाडी सरकार हे आपले कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वासही तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार बद्दल जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत, असा आरोप आघाडी सरकारच्या नेत्यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार पाडून भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले आहेत. त्यामुळे वैफल्यातून सातत्याने सरकार विरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget